दिसंबर मे लगायें ये सब्जीया, बिकेगी 100₹ किलो, 30 दिन मे मालामाल
दिसंबर मे लगायें ये सब्जीया, बिकेगी 100₹ किलो, 30 दिन मे मालामाल
Read More
सुधारित पीकविमा निधी वितरित; शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे कधी येणार?
सुधारित पीकविमा निधी वितरित; शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे कधी येणार?
Read More

तोडकर हवामान अंदाज : राज्यातील वातावरणात होनार मोठा बदल..पाऊस ?

तोडकर हवामान अंदाज : राज्यातील वातावरणात होनार मोठा बदल..पाऊस ? सध्या महाराष्ट्रातील हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उन्हाळ्यासारखे चटके जाणवू लागले आहेत. हवामानातील हा प्रमुख बदल २५ डिसेंबरपासून अधिक तीव्र होणार असून विशेषतः जळगाव आणि खानदेश भागात उन्हाची दाहकता वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही २५ तारखेपासून सकाळ आणि संध्याकाळची थंडी कमी होऊन हवामान सामान्य होण्यास सुरुवात होईल आणि दुपारच्या उन्हाचा प्रभाव वाढेल.

विदर्भाचा विचार करता, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अद्याप कडाक्याची थंडी कायम आहे. २४ आणि २५ डिसेंबरला या भागात हवामानात थोडा बदल जाणवेल, पण २६-२७ डिसेंबरपासून पुन्हा थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तसेच, येत्या ४८ तासांच्या काळात म्हणजेच २१-२२ डिसेंबरपासून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (WD) राज्याच्या अनेक भागांत दुपारनंतर किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल. मात्र, या ढगाळ वातावरणामुळे पावसाची मोठी शक्यता नसून केवळ किरकोळ स्वरूपाची ढगाळ स्थिती अनुभवायला मिळेल.

Leave a Comment