21 ते 23 डिसेंबर या भागात वातावरण बिघडनार – पंजाब डख हवामान अंदाज ; डिसेंबर अखेरच्या हवामान अंदाजाबद्दल पंजाब डख यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असून २१ ते २३ डिसेंबर दरम्यान पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही. शेतकऱ्यांनी सध्याच्या थंडीचा फायदा घेत आपल्या पिकांचे नियोजन करावे, कारण थंडीचा हा जोर आणखी एक महिना टिकून राहण्याची चिन्हे आहेत.
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला हवामानात बदल होण्याची शक्यता असून काही भागांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. आगामी २०२६ सालाबाबत बोलताना डख यांनी स्पष्ट केले की, पुढच्या वर्षी दुष्काळ नसला तरी पावसाचे प्रमाण सरासरी इतकेच राहील. मागील वर्षांसारखी अतिवृष्टी किंवा ढगफुटी यंदा पाहायला मिळणार नाही. पावसाळ्याची सुरुवात मे महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने होईल आणि जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून मुख्य पेरण्यांना वेग येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.








