नमो शेतकरी योजना: ८ वा हप्ता लवकरंच मिळण्याची शक्यता! ; महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा ८ वा हप्ता जानेवारी २०२६ मध्ये वितरित केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक प्रशासकीय हालचाली सुरू केल्या असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २,००० रुपये जमा होणार आहेत. रब्बी हंगामातील पिकांची निगा राखण्यासाठी आणि इतर शेती खर्चासाठी हा निधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ६,००० रुपये दिले जातात. आतापर्यंत ७ हप्ते यशस्वीरीत्या वितरित झाले असून, ८ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. हा हप्ता थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केला जाईल.




















